भाजपा एका पुस्तकाचं प्रकाश करणार असून त्याचं नाव ‘काँग्रेस नसती तर काय झालं असतं?’ असं आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं, आपल्या देशाला नेतृत्व मिळालं नसतं, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंतचे नेते आपल्याला मिळाले नसते. काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज भारत ज्या ठिकाणी आहे तितकी प्रगती झाली नसती. आपला देश अखंड राहिला नसता. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या भाजपाच्या अकलेच्या बाहेरच्या आहेत. कारण ते कधी देशाचा विचार करत नाहीत. ते केवळ उद्योगपतींचा आणि व्यापाऱ्यांचा विचार करतात”