देशात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात निवडणुका हा एक मोठा सोहळा असतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून ते सार्वत्रिक निवडणुका सुरळीत आणि निष्पक्षरीत्या पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. जेव्हा जेव्हा निवडणुका, निवडणूक आयोग, आचारसंहिता, मतदान हे शब्द येतात तेव्हा तेव्हा साहजिकच एका व्यक्तिचं नाव आवर्जून घ्यावं लागतं ती व्यक्ती म्हणजे टी. एन. शेषन! चला तर.. या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त टी. एन. शेषन आणि त्यांची कार्यपद्धती एवढी चर्चेत का होती? हे जाणून घेऊयात.