“राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट का पडली? राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचे कारण काय? तर अजित पवार यांना राजकीय वारसदार म्हणून आधी पुढं आणलं आणि नंतर वरिष्ठांना वाटलं की पुतण्याऐवजी मुलीकडे पक्ष जायला हवा. हेच शिवसेनेतही झालं. उद्धव ठाकरेंना वाटलं, पक्ष किंवा राजकारणात आदित्य ठाकरेंना पुढं आणलं पाहीजे. त्याच अनुषंगाने त्यांनी राजकारणात वाटाघाटी सुरू केल्या”, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.