गेल्या काही महिन्यांत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपा किंवा भाजपासमर्थक पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही अनेक नेते काँग्रेसला रामराम ठोकून महायुतीत सामील झाले आहेत. यावरून राहुल गांधी यांनी आज एका नेत्याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता सोनिया गांधी यांच्याकडे रडला होता, असं राहुल गांधी म्हणाले. यावर नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.