ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज (१८ मार्च) साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. तर साताऱ्यातून महाराजांचं तिकीट निश्चित असल्याचे संकेतही त्यांनी दिले. मात्र आतापर्यंत भाजपाकडून जाहीर झालेल्या यादीत उदयनराजेंचं नाव नसल्याने त्यांच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्याबाबतही गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.