मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अजूनी सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. “२४ तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक लावली. या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला सर्व तज्ज्ञ हजर राहणार आहेत. समाजाकडून दोन दिवस तिथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे. या बैठकीत ठोस निर्णय झाल्याच्या नंतर सरकारला कळणार आहे की आपण सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली असती तर बरं झालं असतं” असं जरांगे म्हणाले आहेत.