मनसेचे अध्यक्ष सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहचले. राज ठाकरेंचा हा दिल्ली दौरा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो आहे. अमित शाह यांच्याशी त्यांची चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महायुतीबरोबर सहभागी होणार का? हा प्रश्न महत्त्त्वाचा असणार आहे. अशात आता संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता यावर एक भाष्य केलं आहे.