महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. अशातच वंचितने आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला बाजूला करत थेट आणि केवळ काँग्रेसला प्रस्ताव दिला आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातील ७ जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत म्हटलं आहे. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.