निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. त्यामुळे महायुतीला प्रचारासाठी अधिक राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे. पाच टप्प्यांतील मतदानामुळे महायुतीच्यावतीने कशाप्रकारे प्रचारयंत्राणा सज्ज ठेवली जाऊ शकते याविषयी व्हिडीओतून थोडक्यात आढावा घेऊयात. दरम्यान, १९ एप्रिल ते २० मे पर्यंत देशात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे.