कालपासून (१९ मार्च) महायुतीमध्ये मनसेच्या समावेशाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राज ठाकरे व अमित शाह यांच्यातील बैठकीमुळे या चर्चेला अधिकच खतपाणी घातलं गेलं आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरेंनी एका भाषणात पुलवामा हत्येमागचं रहस्य उघड केलं होतं. त्यात ते म्हणाले होते, की पुलवामा हत्याकांडाच्या आधी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर पुलवामा हत्याकांड घडलं का? असा प्रश्न त्यांना पडला होता. कदाचित कालच्या भेटीमध्ये अमित शाह यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल” असं राऊत म्हणाले आहेत.