बारामती मतदारसंघात यावेळी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होताना दिसून येत आहे. यावर शरद पवार यांच्या बहीण असलेल्या सरोज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघीही हुशार आहेत. मात्र सुप्रिया सुळे या अनेक वेळा संसद रत्न राहिल्या आहेत. त्यांचा मोठा अभ्यास आहे. पवार कुटुंब कधी फुटणार नाही. आमच्या कुटुंबात विचार स्वातंत्र्य आहे” अशी प्रतिक्रिया सरोज पाटील यांनी दिली आहे.