महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. आज(२१ मार्च) पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. मात्र, बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. याबाबत खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यांनी प्रतिक्रया दिली आहे. वंचितने आम्ही दिलेला प्रस्ताव स्वीकारला असता तर आनंद झाला असता. पुन्हा एकदा प्रमुख नेते एकत्र बसतील आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील, असंही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, मविआने वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र वंचितने प्रस्ताव नाकारत अधिक जागांची मागणी केली आहे.