लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत मोहोळ यांचा समावेश आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर मोहोळ यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पुण्याविषयी त्यांचं व्हिजन काय असेल? याबद्दल प्रतिक्रिया दिली.