शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरात शाहू महाराज द्वितीय यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शाहू महाराजांची अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केली. तसंच शिवसेना पूर्ण ताकदीने शाहू महाराजांना विजयी करणार असा निर्धारही त्यांनी केला. शाहू महाराज हे कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील हे आता ठाकरेंच्या भेटीने निश्चित झालं आहे.