पुण्याच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून मोहन जोशी,अरविंद शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांच्या सह २० जण इच्छुक होते. त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.मात्र अखेर आज काँग्रेसकडून सात उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.