काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांना काल (२१ मार्च) पंढरपूरमध्ये मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेचा सामना करावा लागला. पंढरपूरमधील सरकोली गावाजवळ कथित मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदे यांच्या गाडीला घेराव घातला आणि गावात शिरण्यापासून मज्जाव केला. यादरम्यान काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने जोरात फटके मारले असता प्रणिती शिंदे आक्रमक झालेल्या दिसून आल्या.