बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा-पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचं असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. बीडच्या चराटा येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “परळीसारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा. केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही. मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाही”, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.