लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून निवडणुकीचं बिगुल वाजलंय. पंतप्रधानपदावर यंदा कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीपूर्वी भारत जोडो न्याय यात्रा काढून देशभरात प्रवास केला. भाजपाचा पराभव करण्यासाठी म्हणून देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली, त्यांच्या सभांमधून भाजपाचा पराभव निश्चित असल्याचे सांगितलं जातंय. पण खरंच.. भाजपाला चीतपट करण्यासाठी काँग्रेससमोर कोणती आव्हानं आहेत?, जाणून घेऊयात..