कधीकाळी अरविंद केजरीवाल यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, केंद्रातल्या काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन देशव्यापी आंदोलन उभं केलं त्या अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (२१ मार्च) रात्री ईडीनं अटक केली. या पार्श्वभूमीवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून या अटकेचं समर्थन केलं जात आहे. दरम्यान, केजरीवाल यांचे गुरू अण्णा हजारे यांनी या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.