भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, वन व सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यंदा पक्षाने चंद्रपूर येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. खरंतर सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेसाठी आपण इच्छुक नसल्याचं सांगितलं असतानाही पक्षाने लोकसभेची ही जबाबदारी सोपवली. त्यामुळे चंद्रपूरच्या जागेसाठी मुनगंटीवार यांचा चेहरा भाजपाने का निवडला? याचा थोडक्यात आढावा घेऊया.