शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून २ एप्रिल रोजी ते अर्ज दखल करणार आहेत. शुक्रवारी (२२ मार्च) सातगाव येथील निर्धार मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. रविकांत तुपकरांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जिल्हाभरात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.