पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज (२४ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर रविंद्र धंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ शहरातील
पैलवानांची बैठक घेतली. त्यामुळे आगामी निवडणुकीत तुम्हाला पैलवानांचा सामना करावा लागणार का त्यावर ते म्हणाले की, तुमच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहेत, असा टोला त्यांनी लगावला.