विजय शिवतारे हे बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून दोन्ही पवारांना ते आव्हान देणार आहेत. त्यासाठी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शनिवारी (२३ मार्च) ते इंदापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आलेली ही संधी सोडू नका, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचं सांगितलं. तसंच यंदाची निवडणूक वेगळी आहे असं सांगतानाच त्यांनी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या मतविभाजनावरही भाष्य केलं.