आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्ष सोशल मीडियाचा वापर करत आहेत. मात्र यामध्ये आता भर पडली आहे ती एआय तंत्रज्ञानाची. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून एआय एक प्रभावी शस्त्र म्हणून वापरलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत एआय वापराविषयी मतदार म्हणून आपण माहिती घेणंही तितकचं महत्त्वाचं ठरतं.