उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरची युती संपुष्टात आल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल
(२३ मार्च) पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाष्य केलं आहे. एकतर्फी युती तोडल्याची घोषणा करणं दुर्दैवी आहे. हा निर्णय घेताना दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं, असं राऊत यावेळी म्हणाले.