पुणे ग्रामीण, शहर आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे. तर, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी प्रवेश करणार असून महायुतीत राष्ट्रवादीकडून ते लढणार आहेत. यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.