नागपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे, येथून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन वेळा दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. २०२४ मध्येही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. प्रचारासाठी गडकरींनी नागपूरमधील सभेमध्ये नागरिकांशी संवाद साधला. “गेल्या १० वर्षांत नागपूरात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. हा फक्त ट्रेलर आहे, खरा सिनेमा अजून बाकी आहे. माझ्या मुलांना सांगितलंय की, राजकारणात यायचं असेल तर भींतीवर पोस्टर लावावं लागेल. शून्यातून उभं राहावं लागेल. लोकांमध्ये जावून काम करावं लागेल” असं गडकरी म्हणाले.