सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवार कोण असणार यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे. सातारा लोकसभेसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील शड्डू ठोकला असून देशातील संविधान वाचवण्यासाठी आपण लोकशाहीची निवडणूक साताऱ्यातून लढवणार असल्याची घोषणा केली आहे.