गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. बारामतीत नणंद-भावजय अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे असं बोललं जात होतं. आता बारामतीमधून महादेव जानकरांना उमेदवारी दिली जाईल, अशा चर्चा होत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.