काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी अजित पवारांना त्यांच्या राजकीय भूमिकेवरून टोला लगावला होता. सख्ख्या भावानंतर आता अजित पवार यांच्या वहिनीचा एक व्हिडीओही चर्चेत आहे. शर्मिला पवार या सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. इंदापूरमध्ये प्रचारात बोलताना त्यांनी आपल्या घरातल्या चुलत्याला अंतर देणार का असा प्रश्न ग्रामस्थांना विचारला. तसंच ताईंना आपल्याला पुन्हा दिल्लीत पाठवायचं आहे, असंही त्या म्हणाल्या.