उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी पुन्हा अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. अमोल कोल्हेंच्या गेल्या निवडणुकीचा खर्च दिलीप वळसे पाटील आणि आपण केल्याचंही अजित पावर म्हणाले. त्यावर पुण्यात माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे.