पुण्यातील वाडेश्र्वर कट्ट्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर अपक्ष उमेदवार वसंत मोरे हे एकत्र आले होते. यावेळी या तीनही नेत्यांनी इडली सांबर, शिरा खात राजकारणाच्या पलीकड जाऊन गप्पा मारल्या. तसंच वसंत मोरे यांनी आपण अपक्ष निवडणुक लढण्याबाबत पुन्हा एकदा भूमिका जाहीर केली आहे.