शिवसेना ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या यादीवरून आता मविआमधून नाराजीचे सुरू उमटले आहेत. काँग्रेसने या यादीत जाहीर केलेल्या सांगलीसह मुंबईतील काही जागांवरून नाराजी व्यक्त केली आहे. ज्या जागांवरून चर्चा सुरू असताना त्यावर थेट उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामुळे युती धर्म पाळला गेला नसल्याचं काँग्रसेची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.