नवनीत राणा यांना भाजपाकडून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणांनी युवा स्वाभिमानी पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. बुधवारी (२७ मार्च) रात्री त्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राजीनामा दिला. यावेळी त्यांना अश्रुही अनावर झाले होते. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा भाजपामध्ये प्रवेशही केला.