लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आरपीआयला शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्या, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तसंच नवीन आलेल्या पक्षांना जागा दिली जाते. पण जुन्या पक्षांना लक्षात ठेवलं जातं नाही, अशी खंत बोलून दाखवली. रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महायुतीकडून बैठकांना बोलवलं जात नाही. पक्षाचा अपमान होत असेल तर वेगळा मार्ग धरावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असल्याचंही यावेळी त्यांनी नमूद केलं. पुण्यात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.