रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, समितीच्या या निर्णयाविरोधात बर्वे यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.