मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राजगृह या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती दिली. तसंच वसंत मोरेंसंदर्भातील अधिकृत निर्णय एक, दोन दिवसांत जाहीर केला जाईल, असंही ते म्हणाले.