राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमधून लढणार असल्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू असून याबाबत छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला माहिती नसताना नाशिकसाठी दिल्लीतूनच माझ्या नावाचा प्रस्ताव आला आहे, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच तिकीट मिळालं तर आपण नाशिकमधून लढायला तयार आहे” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.