राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख हे महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. तीन पक्षांच्या जागावाटपाच्या तिढ्यात आपल्या पक्षाला विचारले जात नसल्याची सल त्यांच्या मनात होती. त्यातच महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी त्यांना माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांचा काही दिवसांपासून मविआमध्ये जाण्याचा विचार होता. मात्र महायुतीमधील तीनही पक्षांनी त्यांची समजूत काढल्यानंतर आता महादेव जानकर हे महायुतीबरोबरच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे आणि परभणीमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.