सोलापुरात काँग्रेस आणि भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या असून सभांचाही धडाका लावला आहे. अशाच एका सभेत प्रणिती शिंदे यांनी पुलवामा हल्ल्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, प्रतिस्पर्धी उमेदवार राम सातपुते यांनी त्याला जशास तसं उत्तर दिलंय.