लोकसभा निवडणुकीचे टप्पे १९ एप्रिलपासून देशभरात सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी बार ४०० पार हा नारा दिला आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये असून त्यांच्या आगामी प्रचार दौऱ्यांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केलीये.