राज्य सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अॅम्ब्युलन्स खरेदीमध्ये जवळपास साडे सहा हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. या साडे सहा हजार कोटींच्या घोटाळयाबाबत येत्या ५ ते ७ दिवसात तानाजी सावंत यांनी भूमिका मांडवी. तसंच घोटाळेबाज मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली.