निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याने मेळघाटातील आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या. मात्र या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप महिलांनी केला होता. त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि साडे सतरा रुपयाच्या साडीमध्ये लोकांना गुलामीकडे घेऊन जाण्याची व्यवस्था तोडून टाकावी लागेल, असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.