यवतमाळ वाशिम लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना सोमवारी (१ एप्रिल) अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी १२ हजार पाचशे रुपये चिल्लर स्वरूपातील रक्कम नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाकडे भरली. त्यावेळी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे त्यांचा अर्जही कर्मचाऱ्यांनी स्वीकारला नाही. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले मनोज गेडाम हे गेली अनेक वर्ष गोरगरीब जनतेची सेवा करत आहेत. त्याच लोकांनी आपल्याला निवडणुकीत उभं राहण्यासाठी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिल्याचंही त्यांनी सांगितलं.