वंचित बहुजन आघाडीबरोबरची चर्चा थांबली का? असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच वंचितला पाच जागांचाच प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यात अकोल्याची जागाही आहे, असंही राऊत म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या जागांच्या प्रस्तावावरून वंचितची भूमिका सकारात्मक नसल्याचं सध्या चित्र आहे.