बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांवर आता लोकसभा निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. २०१९मध्ये चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. मात्र त्यांचा परावभ झाला. आता सुनेत्रा पवार या थेट पवार कुटुंबातीलच उमेदवाराविरोधात निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.