मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांना अखेर पुण्यातून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटासह, राष्ट्रवादी आणि काँगेसच्या नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे मुंबईत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. अखेर वंचितडून त्यांना पुण्यातून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून शहरात आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.