सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाने आधीच पहिलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र शिवसेना काँग्रेसमध्ये अद्यापही या जागेवरून वाद कायम असल्याची चर्चा आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी आज भूमिका स्पष्ट केली. यातून मार्ग काढण्यात आला असून याबाबत दिल्लीत हायकमांडशी चर्चा झाली आहे. आपण आणि शिवसेनेची मुंबई आणि पुण्यातील टीम सांगलीला जाणार असून ठाण मांडून बसणार, असंही राऊत म्हणाले.