लोकसभा निवडणुकीचे टप्पे १९ एप्रिलपासून देशभरात सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर टीका केली आहे. “ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं त्यांना दहा तास उभे राहून सुद्धा तिकीट मिळाले नाही. अजून दोन-तीन जणं आहेत ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत. भाजपासोबत जाऊन मिळवलं तरी काय? जी गद्दारी करायची होती उद्धव ठाकरेंसोबत केली, महाराष्ट्रासोबत बेईमानी केलेली आहे. आपण पाहिलेत की त्यांनी एक वेळेस सांगितले होते की एकही उमेदवार पडला तर राजीनामा देईल. त्यांना ते तिकीट पण देऊ शकत नाहीत असे हाल त्यांचे सध्या आता सुरू आहेत” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.