वीज दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे लोकसभेसाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळी सहभागी झाले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी “मी रविंद्र धंगेकरांचं दिल्लीला जायचं तिकीट बुक करून ठेवलंय” असं विधान केलं.